इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शोध आणि जप्तीसाठीची पोलिसानसाठी मार्गदर्शक तत्त्वे
पोलिस : इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शोध आणि जप्तीसाठीची मार्गदर्शक तत्त्वे कर्नाटक उच्च न्यायालय निकाला प्रमाणे - अॅड. (डॉ.) प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ वकील महाराष्ट्र सायबरच्या पोलीस अधिकारींच्या माज्या व्याख्यान कार्यक्रमा निमित्त, माझा हा ब्लॉग प्रदर्शित करत आहे. Virendra Khanna Vs State of Karnataka and Ors (2021) वीरेंद्र खन्ना विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटक आणि इतर (२०२१) निकालामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा ईमेल खाती यासंबंधात तपासणी दरम्यान जमलेल्या पुराव्यांना जतन करण्यासाठी शोध घेण्याच्या पद्धती संबंधित अनुसरण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहेत. कोर्ट एका खटल्याची सुनावणी करीत होते, जेथे आरोपीच्या मोबाईल फोन च्या शोध आणि जप्ती संदर्भात चौकशीचा सहभाग होता, या संदर्भात हा निकाल हायलाइट्स केला गेला कि, ज्या तपासामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तपासणी दरम्यान समावेश असतो त्या संदर्भात कोणताही विशिष्ट असा कायदा नाही. हा निकाल असा निष्कर्ष काढतो कि, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शोध आणि जप्ती संदर्भात पोलिस विभागाने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत. अश्य